Ad will apear here
Next
‘असंच होतं ना तुलाही’च्या दुसऱ्या आवृत्तीचे २३ जानेवारीला पुण्यात प्रकाशन
रसिकमान्यतेची मोहर; महिन्याभरात संपली पहिली आवृत्ती
पुणे : सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्याचा परिणाम पुस्तकांच्या विक्रीवरही  झालाय. त्यातही कवितासंग्रह विकत घेऊन वाचण्याचे प्रमाण तर अगदीच कमी आहे... अशी आणि अशा आशयाची वाक्ये आपल्याला ऐकायला मिळतात. काही प्रमाणात ती खरीही आहेत. मिलिंद जोशी यांच्या ‘असंच होतं ना तुलाही’ या कवितासंग्रहाबाबतीत मात्र असे झालेले नाही. अवघ्या एका महिन्यात या कवितासंग्रहाची पहिली आवृत्ती संपली असून, दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २३ जानेवारी २०२० रोजी पुण्यात होणार आहे. 

संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह २० डिसेंबर २०१९ रोजी मुंबईत प्रकाशित झाला. यातील कविता तर वाचकांना भावणाऱ्या आहेतच; पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मिलिंद जोशींच्याच सुंदर हस्ताक्षरात या कविता लिहिलेल्या आहेत. संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात असलेले आधुनिक काळातील हे पहिले पुस्तक ठरले आहे. पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ई-बुक आणि ऑडिओ बुक स्वरूपातही ते पुस्तक प्रकाशित झाले आहे. २३ जानेवारीला असलेल्या जागतिक हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून या हस्तलिखित पुस्तकाची दुसरी आवृत्ती त्या दिवशी प्रकाशित केली जाणार आहे.



या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन २३ जानेवारीला पुण्यात होणार असून, या कार्यक्रमाला अभिनेत्री मुक्ता बर्वेही उपस्थित राहणार आहे. कवितासंग्रहातील निवडक कविता, गजलांचे गायन आणि अभिवाचन या वेळी केले जाणार आहे. मुक्ता बर्वेसह मिलिंद आणि मनीषा जोशी हे दाम्पत्य हे सादरीकरण करणार आहे. 

नव्या पेठेतील पत्रकार भवनात २३ जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. रसिक वाचकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मिलिंद आणि मनीषा जोशी, तसेच ‘बुकगंगा’चे संस्थापक मंदार जोगळेकर आणि संचालिका सुप्रिया लिमये यांनी केले आहे.


(‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिककरा. त्याच्या ऑडिओ बुक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)













 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/QZMWCI
Similar Posts
लवकरच प्रकाशित होणार लेखकाच्या हस्ताक्षरातील पहिले पुस्तक पुणे : संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले मिलिंद जोशी यांनी ‘लिहिलेल्या’ कवितांचा ‘असंच होतं ना तुलाही’ हा संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. या कवितासंग्रहातील कविता तर वैशिष्ट्यपूर्णच आहेतच; पण संग्रहाची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण आहे. संपूर्ण हस्तलिखित स्वरूपात असलेले आधुनिक काळातील हे पहिले पुस्तक ठरणार आहे
से चीज : दंत, मौखिक आरोग्याविषयीच्या डॉ. भक्ती दातार यांच्या पुस्तकाचे आठ मार्चला प्रकाशन पुणे : माणसाचा चेहरा प्रसन्न असला, की समोरच्यावर प्रभाव पाडण्याचे अर्धे-अधिक काम होऊन जाते. ही प्रसन्नता मनावर अवलंबून असते हे खरेच; पण बाह्य सौंदर्याचा विचार करायचा झाल्यास या प्रसन्नतेत सर्वांत महत्त्वाची भूमिका बजावतात ते सुंदर दात. दात सुंदर आणि निरोगी राखण्यासाठी, तसेच संपूर्ण मौखिक आरोग्यच चांगले
कवीच्या हस्ताक्षरातील पहिल्या कवितासंग्रहावर प्रकाशनपूर्व सवलत पुणे : संगीतकार, गायक, चित्रकार आणि कवी असलेल्या मिलिंद जोशी यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेला ‘असंच होतं ना तुलाही’ हा कवितासंग्रह पुण्याच्या बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहे. २० डिसेंबर २०१९ रोजी त्याचे प्रकाशन होणार असून, त्याआधी नोंदणी केल्यास तो २० टक्के सवलतीत उपलब्ध होणार आहे.
प्रसाद शिरगांवकरांची तीन पुस्तके वाचकांच्या भेटीला; २५ फेब्रुवारीपर्यंत प्रकाशनपूर्व सवलत पुणे : सोशल मीडियावरील लोकप्रिय लेखक प्रसाद शिरगांवकर यांची तीन पुस्तके २९ फेब्रुवारी २०२० रोजी वाचकांच्या भेटीला येत आहेत. ‘i-बाप,’ ‘भटक्याची डायरी’ आणि ‘सुखांचे सॅशे’ अशी त्या पुस्तकांची नावे असून, पुण्यातील ‘बुकगंगा पब्लिकेशन्स’तर्फे ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. प्रकाशनपूर्व नोंदणी केल्यास या पुस्तकांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language